गरज मानसिक प्रथोमोचाराची

images

मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा

स्वप्नातील पदर धुक्याचा हातात कसा लाभावा

अशाचप्रकारे आपल्या प्रत्येकाची अवस्था असते, मनात खुपसाऱ्या गोष्टी आपण बोलतो, बऱ्याच सार्या गोष्टी अंतरंगाचा तळाशी साठवत राहतो. कुठे व्यक्त व्हायचे व कुणापाशी व्यक्त व्हायचे या प्रश्नाच्या नादात बरेचदा आपण अव्यक्तपणे मनावर ओझं घेऊन जगत राहतो. शरीराला जखम झाली, आघात झाला तर आपण प्राथमिक उपचार करून होण्याऱ्या भविष्यातील वेदनांना आळा घालतो, पण मानसिक आजारासाठी प्रथमोचार पेटी कुठे असल्याचे आपण पहिले आहे का ? एखाद्याला निराशा आली, एखादा माणूस चिंताग्रस्त झाला किंवा ताण तणावाने हैराण झाला म्हणून आपण त्या व्यक्तीला प्रथोमचार करतो का? जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या शरीरसंपदेसोबत एकदा मानसिक आरोग्याकडे बघावे यासाठी आजचा हा लेख आपल्या समोर सादर करत आहोत.

देशाच्या विकासासाठी व सक्षमवृद्धीसाठी ‘आरोग्य ‘ हे फार गरजेचे आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन परिभाषेनुसार “शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वस्थता आसने आणि फक्त आजार किंवा दौर्बल्याचा आभाव नाही ” वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या व्याख्येनुसार “मानसिक स्वस्थता ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेचा अनुभव येतो. ती जीवनातले सर्वसामान्य ताणतणाव सांभाळू शकते आणि समाजाला योगदान देऊ शकते. या निर्णायक तात्पर्यानुसार ‘मानसिक आरोग्य ‘ हे व्यक्तीच्या स्वस्थतेशी आणि सामाजिक प्रभावी कार्यासाठी संस्थापना आहे.

आज आपल्या समाजात हृदयविकार, ;कॅन्सर, एच.आय.व्ही.,एड्स सारखे मोठे आजार झाला,अपघात झाला, शारीरिक विप्पती आल्यास आजाराचे गांभीर्य जाणवायला लागते. पण दिवसेंदिवस, वर्षानुवर्षे मानसिक ताण, ओझे, निराशा व उदासीन व खिन्न होत जाणाऱ्या व्यक्तीकडे तितक्या गांभीर्यने पहिले जात नाही. अचानक सामान्य वर्तन किंवा रेग्युलर लाईफ जगणारा माणूस जेव्हा एखादी अबनॉरमल ऍक्टिव्हिटी करतो तेव्हा त्याला ‘वेडा’ किंवा ‘सायको’ समजले जाते अशा व्यक्तीना समाजात, परिवारामध्ये व कार्यक्षेत्रामध्ये एक विशिष्ट् कलंक म्हणजेच स्टिग्मा लावला जातो व अर्थातच अशा व्यक्ती मग आपल्याला आज रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड किंवा रस्त्यावर खिन्न, चित्रविचित्र भेदरलेल्या अवस्थेत बघायला मिळतात. आज 4500 लाखापेक्षा जास्त लोक मानसिक विकाराचा शिकार आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशन नुसार 2020 साली औदासिन्यचा दबाव पूर्ण जगात दुसऱ्या क्रमांकावर असेल.(मरे आणि लोपेज 1996)

मानसिक आरोग्याचा दबाव हे विकसित आणि विकास होणाऱ्या देशाच्या उपचार क्षमतेपेक्षा जास्त असेल. मानसिक विकाराच्या वाढत्या भाराशी संबंधित सामाजिक  व आर्थिक खर्चामुळे मानसिक आरोग्याचा प्रसार करण्यास आणि पायबंद व उपचार करण्यास केंद्रित झाले. म्हणून मानसिक आरोग्य वर्तुणीकीवर आवलंबून आहे आणि शारीरिक आरोग्य व जीवनाच्या दर्जासाठी प्रामुख्याने महत्वाचे आहे.

शारीरिक व मानसिक आरोग्याचा फार जवळचा संबंध आहे आणि हे सिद्ध हि झाले आहे कि औदासीन्यामुळे हृदयरोग व नदी संबंधित आजार होतात. मानसिक विकारांचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या दररोजच्या जीवनावर होऊ शकतो उदा. व्यवस्थित जेवणे, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, सुरक्षित लैगिक संबंध ठेवणे, मद्य आणि तंबाखुचे सेवन न करणे, औषधोपचार नियमित घेणे इ. घटकाचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो. मानसिक विकारामुळे सामाजिक आरोग्य बिघडू शकते उदा. बेरोजगारी, विस्कळीत कुटुंब, गरिबी, अमली पदार्थाचे सेवन व सामाजिक गैरकृत इ. कमजोर मानसिक आरोग्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेच्या कार्यावर परिणाम पडू शकतो मधुमेह, कर्करोग, हृदयरोग यामुळेही औदासीन्याचे धोके वाढू शकतात.

मानसिक विकाराशी संबंधित कलंकामुळे समाजात त्या लोकांवर सर्व विषयात भेदभाव केले जातात उदा. शिक्षण, रोजगार, विवाह इ. यामुळे असे लोक औषोधोपचार करून घेण्यास सतत नकार देतात. संधिग्धता आणि निश्चित लक्षणे नसल्याने व मानसिक आजाराबाबत जागरूकता नसल्याने मानसिक आरोग्य व विकाराचे निदान करणे कठीण होते.

बहुतांश लोकांना मानसिक विकार हे अशा व्यक्तींना होतात असे वाटते जे मानसिक रीतीने कमजोर असतात किंवा भुतबाधित असतात त्यामुळे त्यावर उपचार करण्यात काहीच अर्थ नाही आणि बऱ्याचदा लोकांना असे वाटते कि प्रतिबंध करणारे उपचार सफल घेण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे बहुतांश मानसिक आजार व आजाराने ग्रस्त झालेल्या व्यक्ती एक तर रस्यावर, घाणीत, गर्दीत फिरताना दिसतात किंवा मेंटल हॉस्पिटल म्हणजे मानसिक रुग्णालयात दाखल केलेले दिसतात.

खूप लोकांचा आसा विश्वास आहे कि मानसिक विकाराच्या उपचारात वापरली जाणारी औषधें घेतल्याने वाईट दुष्परिणाम होतात आणि हि औषधे फक्त झोप येण्यासाठी दिली जातात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाझेशन च्या संग्रहित माहिती नुसार मानसिक आरोग्याचे दबाव आणि संबंधित देशात उपलब्ध प्रतिबंधात्मक व उपचारात्मक क्षमता यामध्ये फार अंतर आहे. जगाच्या बहुतेक भागामध्ये अगदी अलीकडच्या काळापर्यंत मानसिक आरोग्य संबंधीच्या उपचाराचा इतर औषधोपचारांशी काहीही संबंध नव्हता. मनोविकारी व्यक्ती आणि त्याचे परिवार, गंभीर सामाजिक कलंक लागण्याच्या भीतीने आणि आपल्या हक्काची जाणीव नसल्याने एकत्र येत नाहीत आणि त्यामुळे गटासारखे वागू शकत नाहीत. स्वयंसेवी संस्थाही आशा कमाला कठीण मानतात कारण अशा कामासाठी चिकाटी लागते आणि मनोरुग्णासोबत काम करण्यास काही लोक घाबरतात.

त्यामुळे ज्याप्रमाणे पोटात दुखते, हातपाय दुखतात तसेच मनाचेही दुखणे असू शकते, पण शारीरिक दुखणे हे आपल्या लक्षात येऊ शकते पण मानसिक आजार दिसतही नाहीत व पटकन लक्षातही येत नाहीत. मानसिक आजाराबद्दल समाजामध्ये अनेक चुकीच्या व वाईट समजुती असून आशा आजाराला बाली पडलेले कित्येक रुग्ण,व्यक्ती औषोडोपचाराविना ‘वेडे’ म्हणून आयुष्य कंठत असतात.

मानसिक आजार म्हणजे वेड लागणे हि एक गैरसमजूत आपल्या समाजात आहे आणि वेड लागले म्हणजे वेड्याच्या दवाखान्यात दाखल करण्याशिवाय काही उपाय नाही असा समज आहे.

मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाणे. कुटुंबातील आणि समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे असा अर्थ आहे. त्यामुळे केवळ शारीरिक दुखापत, वेदना किंवा आजार झाला म्हणजे औषोधोपचार करून स्वस्थ राहणे म्हणजे आरोग्य नव्हे. मानवी आरोग्य हे शारीरिक मानसिक व सामाजिक बदलावर व स्वस्थ्यावर आवलंबून असते त्यामुळे शरीराच्या दुखापतीसाठी जी प्रथोमोचार पद्धती आपण वापरतो तसेच आज सायकॉलॉजिस्ट फर्स्ट एड वापरण्याची गरज आहे. यासाठी मानसिक आरोग्य, आजार,लक्षणे व औषधोपचार पद्धती याविषयी समाजातील जनजागृती करून मानसिक आरोग्य शिक्षण प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवणे हि काळाची गरज बनत आहे.

-अमृता जोशी

M.S.W.(M.P.S.W.), M.J.C.,

Pursuing M.Phil

Advertisements

स्नेह जपूया व स्नेह वाढवूया

स्नेह जपूया व स्नेह वाढवूया

 

आत्महत्या करणे किंवा स्वतःला मारून टाकणे हे समाजासाठी कदाचित शोकांतिका असेल, पण आज कित्येक कुटुंबे त्या आत्महत्यांच्या झळांमधून बाहेर आलेलीच नाहीत. त्यामुळे आत्महत्या व आत्महत्येची कारण बघयला गेल्यास २०१४ च्या आकडेवारीनुसार कौटुंबिक कलह – २१.%, आजार- १८%, वैवाहिक कलह- ५. १%, प्रेम संबंध – ३.२%, व्यसन – २.८%, दिवाळखोरी – १.८ %, परीक्षेतील निराशा -१.८%, बेरोजगारी – १.७%, दारिद्रय – १.३% इ . कारण आजही कुठे कुठेतरी आत्महत्या करणाऱ्या मध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या ह्या पुरुषामध्ये दिसून येतात त्याचे प्रमाण ६७. ७% असून महिलांमध्ये ३२. ३% एवढ्या आत्महत्या होताना दिसत आहेत.

आत्महत्या हि एक मानसिक स्थिती आहे, जी निराशेतून निर्माण होते. आज आपल्या आजूबाजूला कित्येक मनामध्ये, घरामध्ये, कुटुंबामध्ये, संसारामध्ये आत्महत्येच्या ह्या वेदना बघायला मिळतात, तेव्हा आजच्या ह्या आत्महत्या प्रतिबंध दिवस निमित्त आपण प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायला हवा, निराश,उदास,व आत्महत्येचा विचार करण्याऱ्या व्यक्तीस मानसिक आधार देऊन, स्नेहाचा हात पुढे करून आत्महत्या रोखायला हव्यात. संवाद, आनंद,विचारविनिमय व स्नेहाच्या देवाणघेणीतून आत्महत्या रोखायला हव्यात.

‘आत्महत्या’ किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे हा कायद्यानुसार गुन्हा मानला जातो. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या माहिती नुसार ८००००० लोक दरवर्षी आत्महत्या करतात त्यातील १ लाख ३५ हजार म्हणजे १७% लोक हे भारतीय आहेत. १९८७ ते २००७ या वर्षा मध्ये एकूण आत्महत्येचे प्रमाण ७.९% इतके होते आज ते १०.३% पर्यंत पोहचले आहे. भारतातील पूर्व व पश्चिम भागातील राज्यामध्ये आत्महत्या कारण्यार्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून २०१२ च्या आकडेवारीनुसार तामिळनाडूत १२. ५ %, महाराष्ट्रात ११.९% तर पश्चिम बंगाल मध्ये त्याचे प्रमाण ११% आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या रिपोर्ट नुसार २०१४ मध्ये १लाख ३१ हजार लोकांनी आत्महत्या केली होती. भारतामध्ये आत्महत्या करण्याऱ्या पैकी  महाराष्ट्र एक नंबरला असून तर शहरामध्ये चैन्नईचा नंबर लागतो.

मिळालेल्या माहितीनुसार या सदर वर्षात आत्महत्या आकडेवारीमध्ये :- चैन्नई – २२१४, बंगळुरू – १९०६ , दिल्ली – १८८७ , मुंबई – ११९६, भोपाळ – १०६४ इतक्या आत्महत्या घडून आल्या.  त्यासाठी आपण सर्वानी स्नेह जपूया व स्नेह वाढवूया

अमृता जोशी M.S.W. (M.P.S.W.)

 

suicide_2439218f

ब्लू रिबन

ब्लू रिबन

*****  ब्लू रिबन ****

न्यूयॉर्क शहरातल्या एका शिक्षिकेने वर्षाच्या शेवटी तिच्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या शर्टावर निळ्या रिबनचा बो लावला. त्या रिबनवर लिहिले होते Who you are, makes a difference. तुझ्या असण्यामुळे (माझे ) आयुष्य बदलले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला संदेश वाचून खूप आनंद झाला. ”वा, माझ्यामुळे टीचरच्या आयुष्यात फरक पडला आहे.” पण नुसते एवढेच करून ती शिक्षिका थांबली नाही. तिने प्रत्येक विद्यार्थ्याला अजून तीन रिबन दिल्या व सांगितले, ”तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना धन्यवाद द्या व त्यांच्या कपड्यावर ही निळी रिबन लावा.”

एका विद्यार्थ्याने शेजारच्या घरात राहणार्‍या एका तरुणाच्या शर्टावर ”थँक यू, तुझ्यामुळे माझे आयुष्य बदलले आहे म्हणून मी तुला ही निळी रिबन लावतो” असे म्हणत रिबन लावली. तो शेजारी एका ऑफिसमध्ये ज्युनियर कर्मचारी होता. त्याने त्या विद्यार्थ्याला अभ्यासात मदत केल्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षेत अव्वल नंबर मिळाला होता. विद्यार्थ्याने उरलेल्या दोन रिबन त्याला दाखवत विचारले, ”आम्ही शाळेसाठी एक प्रोजेक्ट करतो आहोत. तुझ्या आयुष्यात ज्या माणसामुळे चांगला बदल झाला आहे त्यांना ही रिबन लावशील का?”

कर्मचारी लगेच तयार झाला. दुसर्‍या दिवशी त्याने आपल्या बॉसपाशी जाऊन ”थँक यू You made a difference in my life ” असे म्हणत निळ्या रिबनचा बो लावला. बॉस अत्यंत हुशार होता, कंपनी त्याच्यामुळे चालली होती; पण तो खडूस म्हणूनही प्रसिद्ध होता. तरीही कर्मचार्‍याने बो लावल्यावर बॉसच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो म्हणाला, ”माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात बदल झालाय? तुझ्यासाठी मी इतका महत्त्वाचा आहे हे मला माहीतच नव्हते. थॅक्यू.”

कर्मचार्‍याने त्याला विचारले, ”ही कल्पना माझी नाही. हे एका शाळेतले प्रोजेक्ट आहे. आयुष्यात बदल करणार्‍या लोकांना धन्यवाद देऊन त्यांना हा निळ्या रिबनचा बो लावायचा. तुम्हाला आवडेल असे करायला?”
बॉस एकदम म्हणाला, ”हो नक्की आवडेल. आहे तुझ्याकडे अजून एखादा बो?” कर्मचार्‍याने आपल्याकडचा उरलेला बो बॉसला दिला.
बॉस घरी गेला. त्याने आपल्या मुलाला बोलावले . मुलाच्या शर्टावर निळ्या रिबनचा बो लावत तो म्हणाला ”मी कामामुळे उशिरा घरी येतो, घरी आल्यावर माझी चिडचिड होते, मी तुझ्याशी प्रेमाने बोलतही नाही, मी आजवर तुला कधी हे सांगितले नाही, पण तू जसा आहेस तसाच रहा. तुझे असणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. Who you are, makes a difference in my life ”

मुलगा ढसाढसा रडायला लागला. तो म्हणाला, ”डॅड , मला वाटायचे की तुम्हाला मी अजिबात आवडत नाही. मी तुम्हाला कधीच खूश करू शकणार नाही म्हणून आज रात्री मी आत्महत्या करणार होतो. ही बघा, मी तुम्हाला  व आईला चिठ्ठी लिहून ठेवली होती. पण ही रिबन लावलीस आणि माझं आयुष्य बदलवलेस डॅड.” बॉसने चिठ्ठी वाचली. त्याने आपल्या मुलाला घट्ट पोटाशी धरले. दोघेही एकमेकांच्या मिठीत आनंदाचे अश्रू ढाळत होते. त्या एका रिबनमुळे मुलाला बाबा व आयुष्य दोन्ही मिळाले होते आणि बापालाही मुलगा मिळाला होता.

आई मुलांविषयीचे प्रेम सहज व्यक्त करू शकते. मुलेही आईशी मोकळेपणाने बोलू शकतात. आईला ते जन्मजात कसब असते. कारण स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते . पण पुरुष हा क्षणाचा पिता असतो, पण म्हणून त्यांचे महत्त्व मुलाच्या आयुष्यात कमी नसते. उलट अनेक मुले वडिलांच्या नजरेतही आपण कोणीतरी असावे यासाठी आयुष्यभर झटतात, पण काही वडिलांना त्याबद्दल काहीच वाटत नसते. मुलांकडे पूर्णत: दुर्लक्ष करत हे पुरुष कामात मग्न रहातात.

म्हणतात की, Any man can be a Father but it takes someone special to be a Dad. कोणीही पुरुष बाप सहज बनू शकतो, पण बाबा होणे काहींनाच जमते. चांगला पालक होणे ही प्रवृत्ती आहे. असिधारा व्रत आहे. त्यासाठी शिक्षण, जात, धर्म यांपैकी कशाचीही जरूर नसते. फक्त इच्छा असावी लागते…

सदर पोस्ट आवडल्यास ही ब्लू रिबन इतरांनाही पाठवा
कदाचित त्यांच्यामुळे तुमचं आयुष्य बदलले असेल
“जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही .”

” ब्लू रिबन ” अप्रतिम आयुष्य बिघडवायला वेळ लागत नाही पण घडवायला आत्मविश्वास लागतो मन मोठ असाव लागत

Hysteria

Hysteria

हिस्टेरिया

हिस्टेरिया हा शब्द स्त्रीयांना होणारा आजार दर्शवित असला तरी हा आजार स्त्री -पुरुषात दिसून यतो . हिस्टेरियात एखाद्या भावनेचा द्वंदाचे जेव्हा मानसिक लक्षणात किवा शारीरिक [लक्षणात रुपांतर होते त्याला हिस्टेरिया असे म्हणतात ]सामान्यतः असा समज आहे की अतृप्त राहिलेल्या काम वासनेमुळे हा आजार होतो परंतु हिस्टेरियात कामवासनाच नव्हे तर कोणत्याही भावनाचे द्वंद असू शकते. या द्वंदाचे रुपांतर मानसिक लक्षनात होते.

 

अंगात येणे-

भारतात व इतर विकसनशील देशात अंगात येणे हा प्रकार सामान्य आहे. विशेषत: खेड्यातील स्त्रियांना अंगात येणे हे खुपदा आढळून येते. एखाद्या व्यक्तीच्या मनात कुठल्याही प्रकारचे असमाधान दडपून असेल आणि ते प्रत्यक्ष बोलून व्यक्त करता येणे शक्य नसेल तर ते अंगात येउन व्यक्त होते. उदा. एखाद्या सुनेचा सासू छळ करत असेल आणि त्याबद्दल काही बोलता येत नसेल तर एक दिवस अचानक सुनेच्या अंगात येते त्यानंतर सासू सुनेच्या पाया पडते सून सांगेल तसे सासू वागू लागते. यावरून असे दिसून येते कि मनातील काळजी व असमाधान कमी होते. याला प्राथमिक फायदा असे म्हणतात. त्याचबरोबर सासूने छळ बंद करणे, त्याकाळापुरते सासूने ऐकणे याला दुय्यम फायदा असे म्हणतात. भावनात्मक द्वंदाचे अशा लक्षनात जे रुपातर होते ते मुद्दाम केले जात नाही. तसेच हे असे होते याबद्दल रुग्णाला जाणीव नसते. रुग्ण खोटे बोलतात किवा नाटक ढोंग करतात असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. ढोंग किवा नाटक रुग्णात क्वचितच दिसून येते.

 

हिस्टेरिकल फ्युग –

यामध्ये एखादि व्यक्ती एखाद्या तीव्र तणावाच्या घटनेनंतर घर सोडून दुसर्या गावाला निघून जाते अगर भटकत राहते. त्यावेळी त्याव्यक्तीला आपण कोण किवा कुठे आलो आहोत याची जाणीव किवा भान नसते, ज्यावेळी हि फ्युग संपते त्यावेळी ती व्यक्ती भानावर येते व तिला आपण कोण व कुठे आलो आहोत याची जाणीव होते

मानसिक द्वंद्वाचे शारीरिक रुपातर –

१. वाचा बसणे .

२. अंधत्व येणे .

३. बेशुद्ध होणे .

४. ऐकू न येणे.

५. दातखिळी बसणे .

६. झटके येणे.

७. लकवा मारल्या प्रमाणे एका बाजूची शक्ती जाणे .

८. उलट्या होने.

९. एक सारख्या उचक्या लागणे.

१०. एकाच हातातील किवा पायातील शक्ती जाते.

११. चालताना तोल जाणे.

१२. शारीरिक वेदना होणे.

 

वरील शारीरिक लक्षणे एकाएकीच सुरु होतात आणि त्या लक्षणाचा व रुग्णाच्या वातावरणातल्या समस्यांचा संबध आजूबाजूचे लोक घालू शकतात. जसे एखाद्या मुलाला शाळेत जावयाचे नसेल तर त्याच्या पोटात दुखते. काही स्त्रियांची कुणी रागवेल या भीतीने अगर त्याच्या मन विरुद्ध काही झाले तर दातखिळी बसते व त्या बेशुद्ध पडतात किवा त्यांना झटके येतात .

 

वरील शारीरिक लक्षणे खोटी असतात किवा रुग्ण मुद्दाम तसे करतो असे नसून भावनाचे शारीरिक लक्षणात रुपातर होते व ते रुग्णाच्या सुप्त मनामध्ये होते. या बद्दल रुग्णाला जाणीव नसते. याचवेळी रुग्णाची शारीरिक तपासणी केल्यास शरीरात काहीच दोष आढळून येत नाहीत. कि, ज्यामुळे रुग्णामध्ये शारीरिक लक्षणे निर्माण होतील.

मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिस

मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिस  या आजारामध्ये व्यक्तीच्या भावना स्थिर पातळीवर राहत नाहीत. वातावरण अगर परिस्थितीत कोणतीही घटना न घडता किवा काहीही कारण नसताना या प्रकारात मोडणाऱ्या रोग्यास एकतर उदासीनता अगर अतिआनंद होतो. हि स्थिती काही मिनिटे , तास , दिवस, आठवडे किवा महिनेपर्यत टिकून राहू शकते. नंतर अतिआनंद होतो. हि स्थिती काही मिनिटे,तास,दिवस ,आठवडे किवा महिनेपर्यंत टिकून राहू शकते . नंतर भावना मूळ पातळीवर येतात . भावनांचा हा चढ -उतार व्यक्तीच्या बाबतीत प्राथमिक स्वरूपाचा असतो . व या आजाराची लक्षणे उदासीनता किवा अतिआनंद  याबरोबर यातून निर्माण होत असतात व ही लक्षणे उदासीनता किवा अतिआनंद या बरोबर निगडीत असतात. भावना ज्यावेळी नेहमीचा स्थिर पातळीला येतात त्यावेळी रोगाची लक्षणे शिलक्कच राहत नाहीत.

मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिस चे जनसमुदायातील  प्रमाण –

या आजाराचे प्रमाण पुरुषामध्ये १. ० ते १. ५ व स्त्रीयांमध्ये १. ५ते २. ०० टक्के असते . याचा अर्थ तुलनात्मकरित्या स्त्रियांमध्ये प्रमाण अधिक असते . हा आजार कोणत्याही वयात उदभवू शकतो. परंतु तिशी किवा चाळीशी मध्ये होण्याचे प्रमाण अधिक आढळते . मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिस  हा आजार ठराविक लोकांना होतो असे नाही,शहरात अधिक व खेड्यात कमी असेही प्रमाण नसते. जगभर हा आजार आढळून यतो. त्याचा हवामान खाणे -पिणे याशी काहीच संबध नसतो.

मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिस होण्याची कारणे –

मेंदूतील काही भागातील पेशीत अत्यंत सूक्ष्म असे रासायनिक बदल होतात . त्यामुळे उदासीनता व अतिआनंद निर्माण होतात . रासायनिक बदल पूर्व स्थितीला आले की भावना पूर्ववत स्थिर पातळीवर येतात , मेंदूतील रासायनिक बदलाचे कारण अनुवांशिकता ही असते . या रोगाने पिडीत व्यक्तीचा अगर आई – वडील यांचापासून अनुवंशिकते आजार चालत येण्याची शक्यता असते . पण जवळच्या रक्ताच्या सर्वच व्यक्तींना या आजाराची बाधा होतेच असे नाही . (आई -वडील ,भाऊ -बहिणी,मुले -मुली हे जवळच्या रक्ताचे समजले जातात )

जनसमुदायात या आजाराचे प्रमाण १ ते २ टक्के असले तर जवळच्या रक्ताच्या व्यक्तींना हा रोग होण्याची शक्यता असते.

अनेकांची अशी समजूत असते कि एखाद्या घटने असे घडून येते . पण प्रत्यक्षात घटनांचा आणि या आजाराचा मुळीच संबंध नसतो. अनुवांशिकतेमुळे हा आजार उदभवतो .

 

या आजाराचा करणा बद्दल मनोविज्ञान शास्त्रात इतर काही सिद्धांत मांडले आहेत. फ्रोईद याने आपल्या ‘सायको अअनालिसिस ‘ या सिद्धांतात मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिसची कारणे वेगळ्या तऱ्हेने दाखवली आहेत .

मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिसची लक्षणे –

अ ) उदासीनता

१. उदासीनतेच्या अवस्थेत रुग्णाची उदासीनता अत्यंत तीव्र झालेली असते. काहीना तीव्र दुः ख होते ,रडू कोसळते ,छोट्या छोट्या गोष्टीही मनाला लागतात ,एकटेच बसून अश्रू ढाळतात . उदासीनता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते ,वागण्यात बोलण्यात चालण्यातही दिसते . आजूबाजूच्या लोकांना ती जाणवते त्यामुळे ते रुग्णांच्या उदासीनतेत सहभागी होतात .उदसिनतेच्या अवस्थेत रुग्णाला चटकन थकवा यतो रुग्ण स्वतः च्या गहन विचारात गुंग असल्याचे दिसून येते .त्यचि शारीरिक हालचाल मंद रीतीने होते.

२. काही लोक या अवस्थेत चीड चिडे होतात . मनाविरुद्ध झालेल्या गोष्टीमुळे त्यांना चटकन संताप येतो . हा चीडखोरपणा त्यांच्या चेहऱ्यावर व वागण्यात दिसतो .

३. उदासीनतेच्या अवस्थेत रुग्णांना निराशा वाटते . कोणतेही काम करावेसे वाटत नाही. झोपून रहावेसे वाटते . कोणत्याही कामात आनंद व स्वारस्य वाटत नाही एखादे काम करावयाचे त्याने ठरवले तर केवळ मारून मुटकून करण्याची वृत्ती राहते क़मच वेगही अगदी मंद असतो. मनाची द्विधा अवस्था होऊन कामात योग्य निर्णय घेता येत नाही. बाहेर फिरावयास जावे अगर कुणास भेटावे असेही वाटत नाही. घरी कोणी भेटावयास आले तरी आपण गरात नाही आसे सांगून भेटीची टाळाटाळ केली जते.

४. उदासीनतेच्या आवस्थेत काही रुग्णांच्या  बाबतीत आत्मविश्वास ढळतो किवा पूर्णपणे नष्ट होतो. काही लोकांना आपल्याला कोणतीच गोष्ट जमणार नाही असे वाटू लागते आपण कधीच बरे होणार नाही  अगर आपल्यास वेड  लागेल अशीही भीती वाटते. ढळलेला आत्मविश्वास त्याच्या बोलण्यात , चालण्यात जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात प्रतीत होतो. असे रुग्ण स्वताच्या तंद्रीतच वावरतात.

५. या अवस्थेत काहीना अत्यंत काळजी, निराशा, भीतीमुळे छातीत धडधडणे , हातपाय कापणे, पोटात गोळा येणे, आपण आता मारतो असे वाटणे अशी लक्षने वाटू लागतात. आपणास कश्या बद्दल भीती वाटते ते काही वेळा त्यांना निट सांगता येत नाही.

६. या आवस्थेत काहीना बैचेन वाटते. निरनिराळ्या विचारामुळे ते बैचेन होतात. विचारावर नियत्रणहि घालता येत नाही. कोणत्याही कामात लक्ष केद्रित करत नाहीत. काही रुग्ण बैचेनीमुळे येरझार्या घालतात किवा बिछान्यावर तळमळत राहतात.

७. काही रुग्णांना या अवस्थेत निरनिराळे विचार येत राहतात किवा एकच विचार पुन्हा पुन्हा येत राहतो. याचे उदाहरण दरवाज्याला कुलूप लावले तरी सारखे सारखे ओढून पाहणे. सारखे सारखे हात पाय धुवूनहि हात पाय अस्वछ आहे वाटते. काही लोकांना परस्पर विरोधी कल्पना आढळून येतात. समाजातील प्रतिष्ठाना बदडून काढावे, त्याची मानहानी करावी, असे विचार त्याच्या डोक्यात घोळत राहून ते कमालीचे अस्वस्थ होतात.

 

ब ) अतिआनदाची लक्षने

१. अतिआनदाच्या अवस्थेत काही रुग्णांना मनात अत्यंत समाधान वाटते. त्याचा चेहरा आनंदी दिसतो. ते स्वत हसत असतात. विनोद करून दुसर्यांना हसवितात. त्याच्या आजूबाजूचे लोक त्याच्या आनंदात सहभागी होतात.

२. या अवस्थेत काही रुग्णाचा चीडचीडेपणा वाढतो सर्व गोष्टी आपल्या मताप्रमाणेच झाल्या पाहिजेत असे त्यांना वाटते. कोणी विरुद्ध बोलले तर त्यांना राग येतो. काही वेळा ते घरच्या व बाहेरच्या लोकाच्या अंगावर धावून जातात त्यामुळे त्याचे इतरांशी पटेनासे होते.

३. या अवस्थेत रुग्ण अत्यंत उत्तेजित होतो. शीघ्रसंतापी बनतो. सुरवातीला जरी हे लोक विनोदाने इतराच्या दृष्टीने कंटाळवाने होते. त्यामुळे रुग्ण इतराशी पटेनासे होते.

४. या अवस्थेत काही रुग्णाचे लक्ष केंद्रित होऊ शकत नाही .

५. काहीची झोप कमी होते

६. या अवस्थेत काही रुग्ण मोठमोठ्या योजना माणशी आखू लागतात. त्यात कारखाना काढणे, धरण बांधणे अशा अव्यवहार्य गोष्ठी मनाशी आखतात.

७. आत्मविश्वास अचानक वाढतो त्यामध्ये काहीना आपल्या अंगात दैवी शक्ती आहे आसे वाटते. याच अतिआनंदामध्ये आपण निवडणुकीस उभे राहून आमदार बनू , मंत्री बनू असे वाटते.

८. अनावश्यक खरेदी करणे, दुकानदाराला बक्षिसि देणे, व्यवहारावरती नियंत्रण नसने. मोठमोठ्या मेजवान्या देणे.

९. या अवस्थेत काही लोक धार्मिक बनतात. देवपूजा , भजन, कीर्तन या वरती तासनतास घालवतात .

१०. संशयी वृत्ती बळावते , व्यसन लागते.

११. या अवस्थेत काही रुग्णाचे स्वतवरील नियत्रण पूर्णपणे नाहीसे होते ते कुठेही काहीही बोलू लगतात.

वरील लक्षना पैकी रुग्णात किती लक्षने दिसतात हे महत्वाचे नसून वरील प्रमाणे लक्षने रुग्णात आढळतात  काय हे पाहणे महत्वाचे असते. घरच्या मंडळींनी या लक्षणाची नोंद घेऊन मानसोपचार तज्ञांच्या निदर्शनास ती आणली पहिजेत.

Emotional Intelligence

भावनिक बुद्धी म्हणजे कौशल्याचा असा संच , ज्यामध्ये अचूक मूल्यमापन , अभिव्यक्ती आणि भावनावरील नियत्रण अभिप्रेत असते. भावनिक बुद्धी हि बुद्धीची संवेदंशील बाजू आहे . केवळ चांगला बुद्धीगुणाक आणि शालेय गुणवत्ता असणे जीवनात यशस्वी होण्यासाठी पुरेसे नाही . तुम्हाला असे अनेक लोक आढळतील , जे शेक्षणिक क्षेत्रात बुद्धिमान असतात . परंतु त्याच्या स्वतच्या जीवनात अयशस्वी राहतात . अशा लोकांना कुटुबांत , कामाच्या ठिकाणी आणि आंतरवेयक्तिक संबधामध्ये समस्या निर्माण होतात . त्याच्यात कशाचा अभाव आसतो . तरी काही मानसशास्त्रज्ञाची समजूत आहे कि , त्यांच्यात असलेला भावनिक बुद्धीचा अभाव हे त्याच्या समस्येचे मुळ असू शकेल .

भावनिक बुद्धीची संकल्पना सर्वप्रथम सलोव्ही आणि मेयर यांनी मांडली . त्याच्या मते “स्वताच्या व इतराच्या भावनाची जाणीव होण्याची , त्याच्यातील भेद ओळखण्याची आणि एकाद्याचे विचार व कृतीला मार्गदर्शन करण्यासाठी माहितीचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धी होय . ”

नंतर या व्याख्येमध्ये सुधारणा करण्यात आली आणि हि व्याख्या चार वेगवेगळ्या क्षमतामधे विभागली गेली . संवेदन होने , उपयोजन करणे , समजून घेणे आणि भावनाचे व्यवस्थापन करणे . या क्षमता भिन्न असल्यातरी परस्पराशी संबधित आहेत . बौद्धिक पातळी स्पष्ट करण्यासाठी जसा बुधीगुनाकाचा उपयोग केला जातो , तसेच भावनिक बुद्धी स्पष्ट करण्यासाठी भावनिक गुनाकाचा उपयोग केला जातो .

साध्या शब्दात , भावनेसंबधीची माहिती अचूकपणे आणि कार्यक्षमपणे कार्या    कार्यक्षमपणे कार्यान्वित करण्याची क्षमता भावनिक बुद्धीशी संबधीत आसते . भावनिक बुद्धीमध्ये भावनिक , वेयक्तिक , सामाजिक जीवनात टिकून राहण्यासाठी लागणारी बौद्धिक परिमाणे याचा विचार केला जातो . हि बौद्धिक परिमाणे देनदिन कार्यासाठी बुद्धीच्या बोधात्मक आणि मानसिक बाजूपेक्षा नेहमीच जास्त महत्वाची असतात . बुद्धीचा हा कमी बोधात्मक भाग स्वताला आणि इतरांना समजून घेणे , लोकाशी नाते संबध जोडणे आणि जवळच्या परीस्थितीशी जुळवून घेणे आणि बरोबरी करणे याचाशी संबधीत असतो. भावनिक बुद्धी

१. स्व-जाणिव : व्यक्ती तिच्या भावना आणि भावनाचे कारण ओळखते . परिणामत ती स्वताचा निरिक्षक असते . ज्यामुळे ती वेयक्तिक कृतीविषयी स्पष्टपणे किवा जास्त माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकते .

२. आत्मनियत्रन :   ज्या व्यक्तीजवळ  आत्मनियत्रनाचे शस्त्र असते , ती व्यक्ती भावना निर्माण करणाऱ्या परीस्थितीमुळे जो आवेग निर्माण होतो , त्या आवेगाच्या आधारावर एकट्यानेच परीस्थितिला प्रतिसाद देण्यापेक्षा काळजीपूर्वक तिच्या कृतीवर नियंत्रन ठेवते.

३. आत्मप्रेरण : जेव्हा एखादी गोष्ट चुकीची घडते , तेव्हा भावनिक बुद्धी उच्च असलेली व्यक्ती हे विचारात नाही कि , माझे काय चुकत आहे ॽ ती विचारते कि , मी यात सुधारणा कशी करू शकतो ॽ

४.  तद्नुभूती  : इतराच्या भावना ओळखण्यात व्यक्ती अभिरुची आणि क्षमता प्रदर्शित करते . तद्नभूती , व्यक्तीला स्वताला दुसर्याच्या जागी कल्पून त्याला समजून घेते .

५. परिणामकारक नातेसंबध : याआधी दिलेल्या चार कौशल्याचा उपयोग करून व्यक्ती इतराशी अशा पद्धतीने संप्रेषन साधते , ज्यामध्ये त्याच्या तसेच तिच्या गरजचा विचार केला जातो. अनावश्यक वाद करण्यापेक्षा समस्या सोडविण्यावर जास्त भर आसतो . भावनिक बुद्धी उच्च असलेली व्यक्ती विधायक ध्येय मनात ठेवून संप्रेषन साधत असतात .

 

तद्नुभूती, सामाजिक जबाबदारी , आवेग नियत्रण आणि आपल्या वयानुरूप व जबाबदार पद्धतीने इतराशी संबध जोडण्याची क्षमता इ. वॆशिष्ट्याचे मापन भावनिक बुदधीमापणी करते . ताण सहन करण्याची , आशावादी दृष्टीकोन टिकवून ठेवण्याची आणि मानवी जीवनातील देनदिन समस्या सोडवण्याची क्षमता यांचा समावेश भावनिक बुद्धीमध्ये होतो.

विविध अभ्यासानंतर आसे अढळून आले आहे कि , कमी दर्जाची भावनिक बुद्धी असलेल्या पुरुषांना सामाजिक आंतरक्रिया प्रस्थापित करताना अडचणी येऊ शकतात . शिवाय अनैतीकपणे  मादक द्रव्याचा उपयोग करणे , अतिप्रमाणात मद्यपान करणे , विपथगामी वर्तनात गुतून राहणे यांसारख्या अव्यक्त अशा धोकादायक वर्तनामध्ये कमी दर्जाची भावनिक बुद्धी असलेले पुरुष स्त्रियपेक्क्षा जास्त गुंतलेले दिसून येतत.

 

बुद्धीगुणांक

– बोधात्मक . बौद्धिक, तार्किक , विश्लेषणात्मक आणि तर्कसंगत संबधनात्मक क्षमता

– वैयक्तिक माहिती , स्मृती , साठवण , शब्द्संग्रह .

– नवीन ज्ञानाचे सपादन व संघटन एखादी व्यक्ती किती चांगल्याप्रकारे करते , याचे मापन करते .

 

भावनिक गुणांक

– भावनिक , सामाजिक , संप्रेषनात्मक  आणि संबधनात्मक क्षमता .

– स्वताच्या तसेच इतराच्या गरजांचे आकलन .

– परीवेशीय मागण्या आणि दबाव यांच्याशी एखादि व्यक्ती किती चांगल्याप्रकारे जुळवून घेते , याचे मापन करते .

 

विद्यार्थीच्या भावनिक बुद्धीमध्ये सुधारणा व्हावी , या उद्देशाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा  विद्यार्थीच्या शैक्षणीक कामगिरीवर  धनात्मक परिणाम झाला आहे. अशा कार्यक्रमामधून विद्याथ्याचे समाजविरोधी वर्तन कमी करून सहकार्यात्मक वर्तन करण्यास त्यांना प्रोत्साहित केले जाते. अशा प्रकारचे कार्यक्रम वर्गाच्या बाहेरील जीवनातील आव्हानांना  विद्यार्थीना धैर्याने तोंड देत यावे , या दृष्टीने त्यांना सज्ज करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात .

भावनिक बुद्धी आपल्या सभोवतालच्या लोकासोबत राहूनच शिकली जाते . एक पालक म्हणून आपण आपल्या मुलांना भावनिक बुद्धीचे मुल्य शिकवू शकतो , ताण हाताळण्याचे मार्ग दाखवू शकतो , मुलामधील सर्जनशीलतेला प्रोत्सांहन देऊन तिचे जतन करू शकतो .